← जनतेसाठी काम
गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मोफत बससेवेचे आयोजन
PUBLIC LIFE
10 Sep 2026

गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मोफत बससेवेचे आयोजन

भारतीय जनता पार्टी, मुंबई आणि मुंबई अध्यक्ष मा. श्री. अमित साटम जी यांच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त संपूर्ण मुंबईतून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मोफत बससेवेचे आयोजन करण्यात आले.

या उपक्रमांतर्गत भाजपा वरळी विधानसभा मतदारसंघातील विविध वॉर्डमधून चाकरमान्यांसाठी बससेवा रवाना करण्यात आली. त्यानिमित्त भाजपा वरळी विधानसभा कोळीवाडा मंडळाच्या वतीने वॉर्ड क्रमांक १९३ – आदर्श नगर तसेच वॉर्ड क्रमांक १९६ – जांबोरी मैदान येथून १० सप्टेंबर रोजी चाकरमान्यांच्या बस कोकणाच्या दिशेने रवाना करण्यात आल्या.

चाकरमान्यांचा गणेशोत्सवाचा प्रवास सुखरूप आणि आनंददायी व्हावा, त्यांनी आपल्या गावातील लाडक्या गणरायाचे मनोभावे दर्शन घ्यावे आणि दर्शनानंतर सुखरूप मुंबईत परतावे, यासाठी श्री गणरायाच्या चरणी प्रार्थना करण्यात आली.

तसेच १७ सप्टेंबर रोजी मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी जी यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन करण्यात आले.

या उपक्रमाच्या माध्यमातून गणेशोत्सवासाठी आपल्या गावी जाणाऱ्या चाकरमान्यांना सुरक्षित आणि मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.
अधिक माहितीचा दुवा →